बंद

    प्रधानमंत्री- अनुसूचित जाती अभ्युदय योजनेचे नाव : (PM-AJAY)

    • तारीख : 01/02/2022 -

    पुर्वीचे नांव – बाबु जगजीवनराम छात्रावास योजनेचे नाव

    निधी कोणाद्वारे प्राप्त होतो :- केंद्र शासन

    GR (शासन निर्णय) : केंद्र शासन परिपत्रक फेब्रुवारी 2022

    योजनेचा उद्येश :

    1. अनुसूचित जातीच्या मुला-मुलींच्या विदयार्थ्यांना माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कॉलेज व विदयापीठामध्ये निवास व्यवस्था पुरवणे.
    2. राज्य सरकार/केंद्र शासित प्रदेश आणि केंद्र व राज्य विदयापीठ / संस्था या विस्तारित बांधकाम व इमारत नुतनीकरण दुरुस्तीकरिता अर्थसहाय्य करणे आणि खाजगी क्षेत्रातील अभिमत विदयापीठांना विस्तारित बांधकामासाठी या योजनेचा लाभ दिला जातो

    योजनेच्या प्रमुख अटी :

    • संस्था सामाजिक न्याय विभागांतर्गत अथवा केंद्रीय विदयापीठअंतर्गतचे विदयापीठ यापैकी कार्यरत असावे, संस्थेने बांधकाम अनुदानासाठी स्वतंत्ररित्या अर्ज केला असावा.
    • संस्थेने बांधकामाचे निश्चित स्वरुपाचे वेळापत्रक सादर करून बांधकाम केंद्रीय अनुदान मिळाल्यापासून ५ वर्षाच्या आत करणे आवश्यक आहे.
    • संस्थेमध्ये १०० प्रवेशितांपेक्षा जास्त प्रवेशितांसाठी अनुदान मिळणार नाही. १०० विदयार्थ्यांपैकी १० टक्के बिगर अनुसुचित जातीचे विदयार्थी असणे आवश्यक आहे.

    दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप :

    • मुलांच्या वसतीगृहासाठी 50:50% ( केंद्र शासन : राज्य शासन : स्वयंसेवी संस्था)
    • मुलींच्या वसतीगृहासाठी 100 % ( केंद्र शासन : स्वयंसेवी संस्था)

    लाभार्थी:

    -

    फायदे:

    -

    अर्ज कसा करावा

    संपर्क कार्यालयाचे नाव : संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण

    Application Form : जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडे सादर करावा