शासकीय औद्योगिकप्रशिक्षण संस्थांमधील पीपीपी योजनेंतर्गत उपलब्ध जागांवर तसेच खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये केंद्रीय ऑनलाईन पध्दतीने प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता
निधी कोणाद्वारे प्राप्त होतो :
राज्य शासन
GR (शासन निर्णय) :
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्र.व्यप्रशु-2019/प्र.क्र.173/शिक्षण-1, दि.1 ऑगस्ट,2019
योजनेचा उद्देश :
व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेचे नाव. राज्यात शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमार्फत शिल्पकारागीर योजनेंतर्गत प्रशिक्षण देण्यात येत असून, युवकांचे रोजगाराभिमुख प्रशिक्षणाद्वारे रोजगार व स्वयंरोजगारासाठी सक्षमीकरण करुन खाजगी औद्योगिक आस्थापनांना लागणाऱ्या कुशल मनुष्यबळाचा पुरवठा करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
पात्रतेचे निकष :
- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील पीपीपी योजनेंतर्गत प्रवेशासाठी उपलब्ध जागांसाठी व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये अनु.जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेला असावा.
- विद्यार्थ्याने यापूर्वी खाजगी व शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये कोणत्याही अभ्यासक्रमाचा लाभ घेतलेला नसावा. तसेच केंद्र / राज्य शासनाच्या विभागाने अथवा त्यांच्या अधिपत्याखालील स्थानिक प्राधिकरण, कंपन्या अथवा महामंडळे यांनी पुरस्कृत केलेल्या कोणत्याही प्रशिक्षण कार्यक्रमाचा यापूर्वी लाभ घेतलेला नसावा.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा 8.00 लाख
- अनु.जाती प्रवर्गातील विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
लाभाचे स्वरुप :
- विद्यार्थ्यांकरिता विहीत केलेल्या प्रशिक्षण शुल्काच्या रक्कमेची 100 % प्रतिपूर्ती अनु.जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना अनुज्ञेय राहिल.
लाभार्थी:
-
फायदे:
-
अर्ज कसा करावा
संपर्क कार्यालय : संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण
अर्जाचा नमुना : http//mahadbtmahait.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज