बंद

    माध्यमिक शाळेत शिकत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती.

    • तारीख : 18/09/2003 -

    निधी कोणाद्वारे प्राप्त होतो: राज्य शासन

    GR (शासन निर्णय) :

    • सामाजिक न्याय व सांस्कृतिक कार्य विभाग शासन निर्णय क्रं.इबीसी-1094/प्र.क्र.109/ मावक-2, दि.17 ऑगस्ट, 1995

    योजनेचा उद्देश :

    • इयत्ता 5 वी ते 7 वी मधील दोन गुणवत्ता धारक मागासवर्गीय विद्यार्थ्यांना तसेच इयत्ता 8 वी ते 10 वी मध्ये शिक्षण घेणा-या पहील्या दोन मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.

    पात्रतेचे निकष :

    • मान्यताप्राप्त प्राथमिक / माध्यमिक शाळेतील इ. 5वी ते 10वी च्या वर्गामध्ये शिकणा-या मागासवर्गीय विद्यार्थी असावा.
    • ही शिष्यवृत्ती मागील वार्षिक परिक्षेत कमीत-कमी 50 % व त्याहून अधिक गुण मिळवूण मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधुन प्रथम व द्वितीय क्रमांकात उत्तीर्ण झालेल्या गुणवत्ता प्रदान मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मंजूर करण्यात येईल.
    • या शिष्यवृत्तीसाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उत्पन्नाची अट नाही.
    • ही शिष्यवृत्ती मिळण्यासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची आवश्यकता नसते.

    लाभाचे स्वरुप :

    • इयत्ता 5 वी ते 7 वी च्या विद्यार्थ्यांना दरमहा 50 रुपये (500 रुपये 10 महीन्यासाठी) आणि इयत्ता 8 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांना दरमहा 100 रुपये (1000 रुपये 10 महीन्यासाठी)

    अर्ज करण्याची प्रक्रिया :

    • संबंधित शाळेमधून विद्यार्थ्याचा ऑनलाईन अर्ज भरुन तो अर्ज संबंधित तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी यांचेकडे ऑनलाईन पध्दतीने सादर केले जातात.
    • गटशिक्षणाधिकारी यांचेकडून अर्ज व कागदपत्राची छाननी करुन सदरचे अर्ज संबंधित जिल्हयाच्या जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांचेकडे ऑनलाईन पध्दतीने सादर केले जातात.
    • जिल्हा समाज कल्याण, जिल्हा परिषद यांचेकडून अर्ज मंजूर होऊन सदर विद्यार्थ्याची शिष्यवृत्तीची रक्कम संबंधित विद्यार्थ्याच्या बँक खात्यात महाडीबीटी प्रणालीद्वारे जमा करण्यात येते.

    लाभार्थी:

    -

    फायदे:

    -

    अर्ज कसा करावा

    संपर्क कार्यालय: संबधित जिल्हयाचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी आणि शाळेचे मुख्याध्यापक

    Application Form : या योजनेसाठी https://prematric.mahait.org/login/login
    या वेबसाईटवर शाळेच्या मुख्याध्यापकांनी ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक