साफ सफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती
निधी कोणाद्वारे प्राप्त होतो : केंद्र (६०%) व राज्य (४०%)
GR (शासन निर्णय) :
- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य शासन निर्णय क्र.इबीसी 2022/प्र.क्र.146/शिक्षण-1 दि.20/02/2024
योजनेचा उद्देश :
- अस्वच्छ व्यवसायात काम करणा-या पालकांच्या मुलांना शिक्षण संधी उपलब्ध करुण देण्यासाठी व त्यांना समाज प्रवाहात आणने कामी सदर शिष्यवृत्ती योजनेचे नाव : लागू करण्यात आली आहे.
योजनेचे नाव ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव :
- ही शिष्यवृत्ती सर्व जाती-धर्माला लागू आहे.
पात्रतेचे निकष :
- अस्वच्छ व्यवसायात काम करणारे, अस्वच्छ व्यवसायाशी परंपरेने संबधित सफाईगार, कातडी सोलणे,कातडी कमावणे या व्यवसायात गुंतलेल्या व्यक्तींच्या पाल्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते
- ही शिष्यवृत्ती सर्व जाती-धर्माला लागू आहे.
- उत्पन्नची अट नाही.
- अस्वच्छ व्यवसाय करणा-या व्यक्तीना ग्रामसेवक व सरपंच,नगरपालीका मुख्याधिकारी,महानगरपालीका आयूक्त/उपायुक्त/प्रभाग अधिकारी यांचे कडून अस्वच्छ व्यवसाय करीत असल्या बाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
- अनु जाती मध्ये समावेश केलेल्या पालकांच्या पाल्यांसाठी जातीचा दाखला आवश्यक आहे.
लाभाचे स्वरुप :
- 1ली ते 2री च्या वसतीगृहात न राहणा-या विद्यार्थ्यांना दरमहा रु 350/-
- 3री ते 10वी च्या वसतीगृहात न राहणा-या विद्यार्थ्यांना दरमहा रु 350 /-
- 3री ते 10वी च्या वसतीगृहात राहणा-या विद्यार्थ्यांना दरमहा रु 800 /-
- संबंधित शाळेमधून विद्यार्थ्याचा ऑनलाईन अर्ज भरुन तो अर्ज संबंधित तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी यांचेकडे ऑनलाईन पध्दतीने सादर केले जातात.
- गटशिक्षणाधिकारी यांचेकडून अर्ज व कागदपत्राची छाननी करुन सदरचे अर्ज संबंधित जिल्हयाच्या जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांचेकडे ऑनलाईन पध्दतीने सादर केले जातात.
- जिल्हा समाज कल्याण, जिल्हा परिषद यांचेकडून अर्ज मंजूर होऊन सदर विद्यार्थ्याची शिष्यवृत्तीची रक्कम संबंधित विद्यार्थ्याच्या बँक खात्यात महाडीबीटी प्रणालीद्वारे जमा करण्यात येते.
लाभार्थी:
-
फायदे:
-
अर्ज कसा करावा
संपर्क कार्यालय : संबधित जिल्हयाचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी ,जिल्हा परीषद
Application Form : या योजनेसाठी https://prematric.mahait.org/login/login
या वेबसाईटवर शाळेच्या मुख्याध्यापकांनी ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक