बंद

    इयत्ता 9 वी व 10 वी मध्ये शिकत असणा-या अनुसूचित जातीच्याविद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती

    • तारीख : 20/02/2024 -

    निधी कोणाद्वारे प्राप्त होतो : केंद्र (६०%) व राज्य (४०%)

    GR (शासन निर्णय) :

    • सामाजिक न्याय व विशेष सहाय्य शासन निर्णय क्र.इबीसी 2022/प्र.क्र.146/ शिक्षण-1 दि.20/02/2024
    • सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्र.इबीसी 2022/प्र.क्र.146/शिक्षण-1 दि.20/02/2024 नुसार सन 2021-22 ते 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना राज्यात लागू करण्यात आलेल्या आहेत.

    योजनेचा उद्देश :

    • अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे शाळेतील गळतीचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने केंद्र शासनाने सुरू केली आहे.

    पात्रतेचे निकष :

    • सदर योजनेचे नाव : शासकिय मान्यता प्राप्त शाळेत शिकत असणा-या विद्यार्थ्यांस लागू
    • सदर योजने अंतर्गत शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांच्या पालकांच्या उत्पन्नाची मर्यादा रु.2.00 लक्ष
    • यामध्ये विद्यार्थ्यांच्या किमान गुणांची अट नाही.
    • सदर योजनेचा लाभ केंद्राच्या इतर माध्यमिक पूर्व शिष्यवृत्तीच्या लाभार्थ्यांना लागू राहणार नाही.
    • राज्य शासनाची सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती ही योजनेचे नाव : अनुसूचित जाती प्रवर्गातील इयत्ता 8 वी ते 10 वी च्या सर्व मुलींसाठी सध्या सुरु आहे. यामध्ये पालांच्या उत्पन्नाची मर्यादा नाही. मात्र केंद्र शासनाच्या इयत्ता 9 वी व 10 वी मध्ये शिकत असणा-या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजनेमध्ये रुपये 2.00 लक्ष इतके वार्षिक उत्पन्न असणा-या पालकांच्या इयत्ता 9 वी व 10 वी च्या मुलींचा समावेश होणार आहे. त्यामुळे अनुसूचित जाती प्रवर्गातील इयत्ता 8 वी च्या मुली आणि रुपये 2.00 लक्ष पेक्षा जास्त उत्पन्न असणा-या पालकांच्या इयत्ता 9 वी व 10 वी च्या मूलींकरिता सध्याची सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचे नाव : यापुढेही चालू राहिल. मात्र एकाच लाभार्थ्यांस दोन्ही योजनेचा लाभ घेता येणार नाही.

    लाभार्थी:

    -

    फायदे:

    -

    अर्ज कसा करावा

    संपर्क कार्यालय : संबंधित जिल्हयाचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परीषद

    अर्जाचा नमुना : या योजनेसाठी https://prematric.mahait.org/login/login
    या वेबसाईटवर शाळेच्या मुख्याध्यापकांनी ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक