व्यावसायीक पाठ्यक्रमाशी संलग्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्त(विद्यावेतन) निधी
कोणाद्वारे प्राप्त होतो :
राज्य शासन
GR (शासन निर्णय) :
- सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय : क्र. ईबीसी-2003/प्र.क्र.311/मावक2, दि : 09/06/2003
योजनेचा उद्देश :
- वैद्यकिय, अभियांत्रीकी, कृषी इत्यादी व्यावसायिक अभ्यासक्रमातील महाविद्यायांमध्ये शिक्षण घेणा-या अनु.जातीमधील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती या योजनेतंर्गत वसतिगृहात राहणा-या विद्यार्थ्यांना 235 ते 700 निर्वाहभत्ता दिला जातो.
पात्रतेचे निकष:
- विद्यार्थी व्यावसायीक पाठ्यक्रमात प्रवेशीत असावा.
- विद्यार्थी भारत सरकार शिष्यवृत्ती धारक असावा.
- भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेस जी उत्पन्नाची मर्यादा आहे तीच उत्पन्न मर्यादा या योजनेस लागु राहील.
लाभाचे स्वरुप:
- शिष्यवृत्तीद्वारे मिळणा-या निर्वाहभत्यातुन व्यावसायिक पाठयक्रमाची पुस्तके, स्टेशनरी, निवास, भोजन, इत्यादी बाबींचा खर्च भागविण्यात येतो. व्यावसायिक पाठयक्रमाशी संलग्न असणा-या महाविद्यालयाच्या वसतिगृहात, शासकिय वसतिगृहात, व इतर वसतिगृहात राहतात अशा विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती व्यतिरिक्त या योजनेतंर्गत निर्वाह भत्ता देण्यात येतो. या निर्वाह भत्यातुन व्यावसायिक पाठयक्रमाची पुस्तके,निवास,भोजन,स्टेशनरी इत्यादी खर्चाची प्रतिपुर्ती केली जाते. लाभाचे स्वरुप
अभ्यासक्रम | अभ्यासक्रम | डेस्कॉलर |
चार ते पाच वर्ष | रु.700 प्रतिमहा | रु.1000 प्रतिमहा |
दोन ते तीन वर्ष | रु. 500 प्रतिमहा | रु.700 प्रतिमहा |
दोन वर्षापेक्षा कमी | रु. 500 प्रतिमहा | रु. 500 प्रतिमहा |
लाभार्थी:
-
फायदे:
-
अर्ज कसा करावा
संपर्क कार्यालयाचे नांव : संबधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण
अर्जाचा नमुना : http//mahadbtmahait.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक