रमाई आवास योजना (ग्रामीण व शहरी)
राज्य पुरस्कृत योजना
योजनेचे शासन निर्णय :-
- शासन निर्णय क्र. बी.सी.एच.-2008/प्र.क्र.36/मावक-2, दि.15.11.2008
- शासन निर्णय क्र. बी.सी.एच.-2009/प्र.क्र.159/मावक-2, दि. 9.03.2010
- शासन निर्णय क्र. रआयो-2016/प्र.क्र.578/बांधकामे, दि. 30.9.2016 व 7.01.2017
- शासन निर्णय ग्राम विकास विभाग क्र. प्रआयो-2017/प्र.क्र.60/ योजना-10, दि. 14.7.2017
- शासन निर्णय क्र. रआयो-2017/प्र.क्र.357/बांधकामे, दि.1.10.2018 व दि. 13.02.2019
योजनेचा मुख्य उद्देश
- अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील बेघर व्यक्तींना स्वत:च्या मालकीचे घर उपलब्ध व्हावे.
योजनेचे प्रमुख अटी
- अर्जदार अनुसूचित जाती / नवबौध्द प्रवर्गातील असावा.
- अर्जदाराचे महाराष्ट्रातील वास्तव्य किमान 15 वर्षे असावे.
- लाभार्थ्याच्या नावे स्वत:ची जागा / कच्चे घर असावे.
- यापूर्वी इतर कोणत्याही गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- लाभार्थी सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण-2011 (SECC-2011) च्या प्राधान्यक्रम यादीच्या निकषाबाहेरील असावा.
- दिनांक 1.01.1995 रोजी राज्य शासन, महानगरपालिका, नगरपालिका,स्थानिक स्वराज्य संस्था, एमएमआरडीए, शासनाचे उपक्रम यांच्या जमिनीवर अतिक्रमण करुन त्या ठिकाणी राहात असून त्यांचे घरकुल / निवासस्थान सदर जमिनीवर असल्यास आणि त्यांना संरक्षित झोपडीदार म्हणून संरक्षण प्राप्त झालेले असल्यास, अशा लाभार्थ्यांसाठी 7/12 उतारा सादर करण्याची अट शासन निर्णय दिनांक 15.3.2016 नुसार शिथिल करण्यात आली आहे.
योजनेचे लाभाचे स्वरुप
- शासन निर्णय दिनांक 7.01.2017 नुसार योजनेत खालीलप्रमाणे सुधारणा केली आहे.
क्र. | क्षेत्र | खर्चाची मर्यादा
(रु.लाखात) |
लाभार्थी हिस्सा | उत्पन्न मर्यादा
(रु.लाखात) |
घरकूलाचे क्षेत्रफळ |
अ) | ग्रामीण | 1.32 | निरंक | 1.20 | 269 चौ.फु. |
डोंगराळ / नक्षलग्रस्त | 1.42 | निरंक | 1.20 | 269 चौ.फु. | |
ब) | न.पा./ न.प. | 2.50 | 7.5 टक्के | 3.00 | 323 चौ.फु. |
क) | म.न.पा | 2.50 | 10 टक्के | 3.00 | 323 चौ.फु. |
लाभार्थी:
-
फायदे:
-
अर्ज कसा करावा
संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण