भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना
राज्य पुरस्कृत
शासन निर्णय
- शासन निर्णय क्र.दवसू-2015/ प्र.क्र.347/अजाक, दि. 9/3/2018
- शासन शुध्दीपत्रक दिनांक 28 जुलै, 2021
- शासन निर्णय दिनांक 30 सप्टेंबर, 2021
- शासन निर्णय दिनांक 8 ऑक्टोबर, 2021
योजनेचा मुख्य उद्देश
- राज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या नागरी व ग्रामीण भागातील वस्ती / गावांचा विकास करण्याबाबत लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या कामांना शासन स्तरावरुन मान्यता देऊन या योजनेअंतर्गत घ्यावयाची कामे , अंमलबजावणी यंत्रणा व इतर निकष निश्चित करणे.
योजनेच्या प्रमुख अटी
- लोकप्रतिनिधी म्हणून केवळ विद्यमान खासदार, आमदार व स्थानिक स्वराज्य संस्थेचे सर्व सदस्य व पदाधिकारी यांचे शिफारशीसह प्राप्त प्रस्ताव
लाभाचे स्वरूप
- अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा, मलनि:सारण, पोहोचरस्ते, अंतर्गत रस्ते, सार्वजनिक शौचालये, गटारे, समाजमंदिरे, वाचनालये, स्मशानभुमीचा विकास, व्यायामशाळा, पर्जन्य पाण्याचा निचरा, वाचनालय, अभ्यासिका, धम्म केंद्र, विपश्यना केंद्र इत्यादी कामे (प्रत्येक काम रु.1.00 कोटी ते रु.15.00 कोटी अनुदानाच्या मर्यादेत)
लाभार्थी:
-
फायदे:
-
अर्ज कसा करावा
संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण