अंधश्रध्दा निर्मुलन अधिनियमाची अंमलबजावणी
राज्य पुरस्कृत
शासन निर्णय
- महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समुळ उच्चाटन करण्यासाठी अधिनियम, 2013
- शा.नि.क्र. अंश्रनि-2014/प्र.क्र.293/सामासू, दि.12/8/2014
- शा.नि.क्र. अंश्रनि-2014/प्र.क्र.293/सामासू, दि.12/9/2014
- शा.नि.क्र. अंश्रनि-2016/प्र.क्र.330/सामासू, दि.5/1/2017
- शासन निर्णय दिनांक 15 जुलै 2020
- शासन निर्णय दिनांक 2 मार्च, 2022
योजनेचा मुख्य उद्देश
- महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समुळ उच्चाटन करणे
अपराधासाठी शिक्षा
- सहा महिने ते सात वर्षापर्यंत कारावास आणि रुपये पाच हजार ते पन्नास हजार रुपयांपर्यंत द्रव्यदंड.
गुन्ह्याचे स्वरुप
- ‘दखलपात्र’ व ‘अजामीनपात्र’
व्याख्या :-
- एखाद्या व्यक्तीने, समाजाची घडी विस्कटून टाकण्याच्या दृष्टीने भोंदू लोकांनी सर्वसामान्यत: जादूटोणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तथाकथीत अलौकिक शक्तीच्या किंवा भूत पिशाच्च यांच्या नावाने निर्माण झालेल्या सर्व बाबी या कृतीपैकी कोणतीही कृती स्वत: करणे, किंवा इतर कोणत्याही व्यक्तीकडून करवून घेणे, किंवा त्या कृती करण्यास इतर कोणत्याही व्यक्तीला प्रवृत्त करणे असा आहे.
खटला चालविण्याचे अधिकार :-
- महानगर दंडाधिकारी किंवा प्रथम वर्ग, न्यायदंडाधिकारी व त्याच्यापेक्षा वरीष्ठ दर्जाचे न्यायालय.
दक्षता अधिका-याची नेमणूक :-
- प्रत्येक पोलिस ठाण्यात पोलीस निरिक्षकापेक्षा कमी दर्जा नसलेल्या पोलिस अधिका-याची दक्षता अधिकारी म्हणून नियुक्ती करणे अपेक्षित आहे. या अधिका-यास कोणत्याही ठिकाणी प्रवेश करणे, झडती घेणे, इत्यादी अधिकार आहेत.
- शासन निर्णय दिनांक 2 मार्च, 2022 अन्वये मा.मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या अध्यक्षतेखाली जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समिती (PIMC) पुनर्रचना करण्यात आली आहे.
लाभार्थी:
-
फायदे:
-
अर्ज कसा करावा
संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण