हाताने मैला उचलण्याचे काम करुन घेण्यास प्रतिबंध करणे व त्यांचे पुर्नवसन करण्याबाबत अधिनियम 2013
राज्य पुरस्कृत
शासन निर्णय
- हाताने मैला उचलणा-या सफाई कर्मचा-यांच्या सेवायोजनेस प्रतिबंध आणि त्यांचे पुनर्वसन अधिनियम,2013
- शासन निर्णय दि. 7 ऑगस्ट, 2015
- शासन निर्णय सामाजिक न्याय विभाग दि. 11 जून, 2019
- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्र. हामैऊ-2019/प्र.क्र.358 /अजाक दि. 12 डिसेंबर, 2019
योजनेचा मुख्य आदेश
- हाताने मैला उचलण्याचे काम करुन घेण्यास प्रतिबंध करणे व त्यांचे पुर्नवसन करणे
लाभाचे स्वरुप / अधिनियमातील तरतूदी
- अनारोग्यकारी शौचालये बांधण्यास प्रतिबंध अनारोग्यकारी शौचालयांचा सर्वे करुन ते आरोग्यकारी शौचालयात रुपांतर करणे.
- मॅन्युअल स्कॅव्हेजर्सचा शोध घेवुन त्यांची नोंद करणे आणि त्यांचे पुर्नवसन करणे.
- मलनि:स्सारण वाहिन्या आणि सेप्टीक टँक याची घातक सफाई करण्यास प्रतिबंध.
- मलनि:स्सारण वाहिन्या आणि सेप्टीक टँक यांची यांत्रिक पध्दतीने सफाई करणे.
- मॅन्युअल स्कॅव्हेजर्सच्या पुर्नवसनाची जबाबदारी जिल्हा दंडाधिकारी यांची आहे.
- नुकसान भरपाई एक रकमी देण्याची तरतुद.
- घर बांधण्यासाठी जागा आणि वित्तीय सहाय /तयार घर उपलब्ध करुन देणे.
- व्यावसायिक प्रशिक्षण आणि पर्यायी निर्वाहासाठी सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध.
- अनारोग्यकारी शौचालये बांधणे आणि मॅन्युअल स्कॅव्हेजर्सचे काम करायला लावणे दंडनिय अपराध आहे.
- अनारोग्यकारी शौचालयांचा आणि हाताने मैला उचलणा-या सफाई कामगारांचा सर्वे स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावयाचा आहे.
- सन 1993 पासुन हाताने मैला उचलण्याचे काम करतांना मृत पावलेल्या मॅन्युअल स्कॅव्हेजर्सच्या वारसांना रु.10 लाखाची मदत तात्काळ देण्याची तरतुद
- विशेष व्यवस्थापन कक्षाची स्थापना करणे.
- कल्याणकारी योजना प्रभावी पणे अंमलात आणणे.
- जगजागृती कार्यक्रम हाती घेणे.
लाभार्थी:
-
फायदे:
-
अर्ज कसा करावा
संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण