बंद

    मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना (राज्य)

    • तारीख : 14/07/2024 -

    शासन निर्णय –

    • शासन निर्णय क्र.ज्येष्ठना-2024/प्र.क्र.189/सामासु, दि. 14.07.2024
    • शासन निर्णय क्र.ज्येष्ठना-2024/प्र.क्र.189/सामासु, दि. 08.08.2024
    • शासन निर्णय क्र.ज्येष्ठना-2024/प्र.क्र.189/सामासु, दि. 15.10.2024

    योजनेचा मुख्य उद्देश –

    • महाराष्ट्र राज्यातील सर्व धर्मियांमधील 60 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” राबविण्यात येत आहे.

    योजनेच्या प्रमुख अटी –

    • ज्येष्ठ नागरिक /लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
    • लाभार्थ्याचे वय 60 वर्षे पूर्ण असावे.
    • लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रु. 2.50 लक्ष च्या मर्यादेत असणे आवश्यक आहे.

    लाभाचे स्वरुप – (भारतातील तीर्थक्षेत्रे – 88 , महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रे –161, एकूण 249 तीर्थस्थळे)

    • निर्धारित तीर्थ स्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला एकवेळ लाभ
    • प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रती व्यक्ती रु.30000/-

    आवश्यक कागदपत्रे –

    1. ऑनलाईन अर्ज ( जवळच्या नातेवाईकाचा मोबाईल क्रमांकासह )
    2. आधार कार्ड / रेशन कार्ड
    3. महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र / रहिवास दाखला ( नसल्यास त्याऐवजी रेशन कार्ड / मतदार ओळखपत्र/ शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र/ जन्म दाखला)
    4. सक्षम प्रधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न रु. 2.50 लक्ष पर्यंत असणे अनिवार्य ) किंवा पिवळे / केशरी रेशनकार्ड
    5. वैद्यकीय प्रमाणपत्र
    6. पासपोर्ट आकाराचे 2 फोटो
    7. अटी व शर्तीचे पालन तसेच शासन निर्णयानुसार आचारसंहितेचे पालन करणेबाबतचे हमीपत्र
    8. 75 वर्षे पेक्षा जास्त वय असणा-या ज्येष्ठ नागरिकाने सहायक सह अर्ज सादर केलेला असल्यास सहायकाचे प्रतिज्ञापत्र
    • वेबसाईट तयार करणे – महाराष्ट्र माहिती व तंत्रज्ञान महामंडळ
    • राज्य नोडल अधिकारी – आयुक्त, समाज कल्याण , पुणे
    • योजनेची अंमलबजावणी – जिल्हास्तरीय समिती (अध्यक्ष- पालकमंत्री)
    • योजनेचे सनियंत्रण व आढावा घेणेसाठी समिती – राज्यस्तरीय समिती (अध्यक्ष- मा. मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग)

    लाभार्थी:

    -

    फायदे:

    -

    अर्ज कसा करावा

    वर उल्लेखित