वृध्दाश्रमांना राज्य शासनाचे अनुदान
अ) सर्वसाधारण वृध्दाश्रम (29)
- शासन निर्णय
- शासन निर्णय क्र. क्र.एसडब्लू-1062-44945/ एन, दि.20/02/1963
- शासन निर्णय क्र. बीसीएच-2018/प्र.क्र.79/शिक्षण-2, दि.3/3/2019
योजनेचा मुख्य उद्देश
- महिला वृध्द, निराश्रित, दिव्यांग पिडीतांना भोजन, निवास, आश्रय, इत्यादी सोयी-सुविधा पुरविणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना परिपोषणासाठी अनुदान देणे
योजनेच्या प्रमुख अटी
- महाराष्ट्रातील रहिवासी
- निराधार पुरुष वृध्दाचे वय 60 वर्षे व महिला वृध्दाचे वय 55 वर्ष
लाभाचे स्वरुप
- परिपोषण अनुदान – अनुदानित वृध्दाश्रमातील प्रवेशित वृध्दांकरीता भोजन, निवास व औषधोपचार इत्यादी करीता दरमहा दरडोई रुपये 1500/- अनुदान.
ब) मातोश्री वृध्दाश्रम (23)
शासन निर्णय
- शासन निर्णय क्र.क्र.एसडब्लू-1062-44945/ एन, दि. 20/02/1963
- शासन निर्णय क्र., क्र. संकीर्ण-1095/ के.नं. 160/सुधार-2, दिनांक 17/11/1995
- शासन निर्णय क्र. बीसीएच-2018/प्र.क्र.79/शिक्षण-2, दि.6/3/2019
- शासन निर्णय क्र. ज्येष्ठना-2020/प्रक्र.02/सामासु, दि. 25/07/2024
योजनेचा मुख्य उद्देश
- महिला वृध्द, निराश्रित, दिव्यांग पिडीतांना भोजन, निवास, आश्रय, इत्यादी सोयी-सुविधा पुरविणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना परिपोषणासाठी अनुदान देणे.
योजनेच्या प्रमुख अटी
- लाभार्थी महाराष्ट्रातील रहिवासी असावा.
- निराधार पुरुष वृध्दाचे वय 60 वर्षे व महिला वृध्दाचे वय 55 वर्ष असावे.
लाभाचे स्वरुप
- परिपोषण अनुदान – अनुदानित वृध्दाश्रमातील प्रवेशित वृध्दांकरीता भोजन, निवास व औषधोपचार इत्यादी करीता दरमहा दरडोई रुपये 1500/- अनुदान.
- कर्मचारी पदे – शासन निर्णय दि.25 जुलै, 2024 नुसार 23 मातोश्री वृध्दाश्रमांसाठी प्रत्येक 14 पदे याप्रमाणे एकूण 322 मानधनावरील पदे बाहययंत्रणेकडून उपलब्ध करुन घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.
लाभार्थी:
-
फायदे:
-
अर्ज कसा करावा
ग्रामीण भागासाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद
शहरी भागासाठी संबंधित जिल्ह्याचे सहायक आयुक्त, समाजकल्याण