बंद

    ज्येष्ठ नागरिक धोरण अंमलबजावणी योजना

    • तारीख : 09/07/2018 -

    राज्य पुरस्कृत

    शासन निर्णय

    • केंद्र शासनाचा आई, वडील व ज्येष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम, 2007
    • राज्य शासनाचा आई, वडील व ज्येष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ व कल्याणासाठी नियम, 2010
    • शासन निर्णय क्र. ज्येष्ठना-2016/प्र.क्र.71/सामासू, दिनांक 9 जुलै, 2018

    योजनेचा मुख्य उद्देश

    • ज्येष्ठ नागरिकांचे समाजातील स्थान विचारात घेता त्यांना वृध्दापकाळ चांगल्या तऱ्हेने घालविता यावा, समाजामध्ये त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, शारिरीक व मानसिक आरोग्य सुस्थितीत रहावे, वृध्दापकाळामध्ये त्यांच्या आर्थिक क्षमता, कामाचा हक्क, शिक्षणाचा हक्क व सार्वजनिक मदत पुरविणे.

    योजनेच्या प्रमुख अटी

    • महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा
    • वय 60 वर्षे व त्यापुढील वयाचे सर्व नागरिक

    लाभाचे स्वरुप-

    • रुग्णालयांमध्ये 5 टक्के जागा राखीव
    • एसटी बस प्रवास सवलत
    • शासकीय वैद्यकीय सेवा देणाऱ्या रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी वैद्यकीय सेवा देण्यात येते
    • रुग्णालयामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र चिकित्सा विभाग
    • पोलीस विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी विनाशुल्क हेल्पलाईन सेवा
    • राज्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या व तक्रारींचे निवारण करणेसाठी जनसेवा फौंडेशन पुणे या स्वयंसेवी संस्थे मार्फत राष्ट्रीय विनाशुल्क हेल्पलाईन सेवा (Toll Free Number 14567)
    • आरोग्य कवच विमा – राज्यातील 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरीकांना मोफत आरोग्य निवडक उपचार, विशिष्ट तपासण्या व पाठपुरावा सेवा (प्रस्तावित)

    लाभार्थी:

    -

    फायदे:

    -

    अर्ज कसा करावा

    संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण