अत्याचारास बळी पडलेल्या व्यक्ती व त्यांचेवर / तिच्यावर अवलंबून असलेले व साक्षीदार यांना प्रवास / दैनिक भत्ता/ परिरक्षण खर्च/ आहार खर्च/ वाहतूक खर्च
राज्य पुरस्कृत
शासन निर्णय
- नागरी हक्क संरक्षण कायदा,1955
- अनुसूचित जाती,अनुसूचित जाती (अत्याचार प्रतिबंध),1989
- शासन निर्णय क्र.युटीए-2010/प्र.क्र.14/सुधार-1, दि.20/10/2010
योजनेचा मुख्य उद्देश
- जातीयतेच्या कारणावरुन अत्याचाराला बळी पडलेले त्यांच्यावर अवलंबून असलेले व साक्षीदार यांना अर्थसहाय्य देऊन त्यांचे पुनर्वसन करणे.
लाभार्थी पात्रतेचे निकष
- जातीयतेच्या कारणावरुन अनुसुचित जाती, अनुसूचित जमातीच्या कुटूंबावर/व्यक्तीवर अत्याचार झाल्यास सदर गुन्हयाची नोंद नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 व अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्यांचारास प्रतिबंध ) अधिनियम 1989 खाली होणे आवश्यक आहे.
लाभाचे स्वरुप
- अत्याचारास बळी पडलेल्या व्यक्ती व त्यांचेवर /तिच्यावर अवलंबून असलेले व साक्षीदार यांना प्रवास / दैनिक भत्ता/ परिरक्षण खर्च/आहार खर्च/वाहतूक खर्च शासनाच्या प्रचलित नियमानुसार
- वकील फी व फिर्यादी यांस चहा, नाष्टा शासनाच्या प्रचलित नियमानुसार
लाभार्थी:
-
फायदे:
-
अर्ज कसा करावा
संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण