बंद

    अत्याचारास बळी ठरणाऱ्‍या अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या कुटूंबातील सदस्यांना अर्थसहाय्य देण्याची योजना

    • तारीख : 24/09/1997 -

    केंद्र पुरस्कृत योजना (50%राज्य व 50% केंद्र)

    शासन निर्णय

    • शासन निर्णय क्र.युटीए-1095/प्र.क्र.169/मावक-2, दि.24.09.1997
    • शासन निर्णय क्र.युटीए-2016/प्र.क्र.298/सामासू, दि.23.12.2016

    योजनेचा मुख्य उद्देश

    • नागरी हक्क संरक्षण अधिनियम-1955 अन्वये अस्पृश्यता पाळणे व ती पाळण्यास उत्तेजन देणे हा गुन्हा समजण्यात आला असून त्यासाठी शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. अनुसूचित जाती,अनुसूचित जमातीच्या व्यक्तीवर होणा-या अत्याचारांना पायबंद घालण्यासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध) अधिनियम-1989 व सुधारीत नियम, 1995 हा कायदा लागू करण्यात आलेला आहे. जातीयतेच्या कारणावरुन अत्याचारास बळी पडलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती सदस्यांना अर्थ सहाय्य देऊन त्यांचे पुर्नवसन करणे

    योजनेच्या प्रमुख अटी

    • जातीयतेच्या कारणावरुन अनुसूचित जाती,अनुसूचित जमातीच्या कुटूंबावर/ व्यक्तीवर अत्याचार झाल्यास सदर गुन्ह्याची नोंद नागरी हक्क
    • संरक्षण अधिनियम-1955 व अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध) अधिनियम-1989 खाली होणे आवश्यक,
      वैद्यकीय प्रमाणपत्र (आवश्यक त्या गुन्ह्यात)
    • जातीचा दाखला (सर्व गुन्हे)

    लाभाचे स्वरुप

    • रु.0.85 लक्ष ते रु.8.25 लक्ष

    लाभार्थी:

    -

    फायदे:

    -

    अर्ज कसा करावा

    संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण