केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांकरिता मार्जिन मनी उपलब्ध करुन देणेची योजना
राज्य पुरस्कृत योजना
शासन निर्णय
- सा.न्या.व.वि.क्रमांक मासाका-2018/प्र.क्र.259 (2)/ अजाक, दिनांक 08 मार्च 2019
- सा.न्या.व.वि.क्रमांक स्टॅडई-2020/प्र.क्र.23 (2)/ अजाक, दिनांक 09 डिसेंबर 2020
- सा.न्या.व.वि.क्रमांक स्टॅडई -2020/प्र.क्र.23 (2)/ अजाक, दिनांक 26 मार्च 2021
योजनेचा मुख्य उद्देश
- केंद्र शासनाने स्टँड अप इंडिया योजना माध्यमातून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील उद्योजक यांना प्रत्यक्ष मार्जिन मनी 25% पैकी 15 % अनुदान स्वरूपात उपलब्ध करून देणे.
- सदर योजना ही 2019 पासून राबविण्यांत येत असून सुधारित शासन निर्णय नुसार दि. 26 मार्च 2021 नुसार योजना राबविण्यात येत आहे.
योजनेचे स्वरूप
- केंद्र शासनाचे स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नव नवबौध्द समाजाच्या घटकांतील पात्र नवउद्योजक लाभार्थींना केंद्र शासनाच्या स्टँड अप योजनेअंतर्गत भरावयाच्या स्व:हिस्सा 25% पैकी जास्तीत जास्त 15% मार्जिन मनी संबंधितास वितरीत करावयाची आहे.
लाभार्थी निवडीचे निकष
- केंद्र शासनाने स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत राष्ट्रीयकृत बँकांनी मंजूर केलेल्या प्रकरणांमध्ये अनुसूचित जाती व नव नवबौध्द समाजाच्या घटकांतील पात्र नवउद्योजक लाभार्थींना लाभ देण्यात येणार आहे.
लाभार्थी:
अनुसूचित जाती व नवबौध्द
फायदे:
वरीलप्रमाणे
अर्ज कसा करावा
संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण